Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

अजूनही बरसात आहे

‘सोनी मराठी’ वाहिनीवर तुफान लोकप्रिय झालेली एक मालिका ‘अजूनही बरसात आहे’ चा ‘पार्ट २’ येण्याची शक्यता चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. हा अंदाज बांधण्यामागे कारणही तसेच आहे. मालिकेतील आदिराजची भूमिका साकारलेल्या उमेश कामतने या मालिकेतील कलाकारांसोबतचा एक फोटो समाजमाध्यमावर ‘शेअर’ केला असून त्याला कॅप्शनही विचार करण्यास लावणारे, काहीसे गूढ असणारे दिले आहे. त्यावरूनच प्रेक्षकांनी हा ‘हटके’ अंदाज बांधला आहे. आता या शक्यतेची पडताळणी जून महिन्यातच होणार आहे, हे नक्क्की !

उमेश कामतने म्हंटले आहे, की ”तिघेही भेटलोय एका खास कामासाठी.. जून मध्ये कळेलच..” त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटची मात्र बरसात केली आहे.

एक चाहता म्हणतो, ” काहीही असो, तिघे भेटलात म्हणजे नक्कीच काही तरी जबरदस्त आणि धम्माल असेल !” एकाने म्हंटले आहे, ”अजूनही बरसात आहे’ चा ‘पार्ट 2 ‘ होतो की काय चालू ?” एकाने म्हंटले आहे की, प्रोजेक्ट कोणताही असो पण अभिनेत्री मुक्ताच पाहिजे. याशिवाय अनेक चाहत्यांनी ‘अजूनही बरसात आहे’ चा ‘पार्ट 2’ येणार आहे का? ” असे विचारले आहे. एकंदर, पार्ट २ च्या स्वागतासाठी चाहते तयार आहेत.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा चाहता वर्ग मोठा आहे. या मालिकेत उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांनी मुख्य भूमिका वठविल्या होत्या. मालिकेत उमेश आदिराजच्या भूमिकेत तर मुक्ता मीराच्या भूमिकेत दिसली होती. मीरा आणि आदिराज यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेचा लवकरच दुसरा भाग येण्याची शक्यता आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *