Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

फ्रान्समध्ये कामगारांची निदर्शने

कामगार दिनानिमित्त फ्रान्समध्ये कामगारांकडून निदर्शने करण्यात आली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारने पेन्शन सुधारणांबाबत उचललेल्या पावलांच्या विरोधात ही निदर्शने झाली. हिंसाचार होऊन त्यात 108 पोलीस जखमी झाले. पोलिसांनी देशभरातून 291 जणांना ताब्यात घेतले.

मंत्री गेराल्ड डरमॅनिन यांनी पत्रकारांना सांगितले की, “या आंदोलनात मोठ्या संख्येने पोलीस जखमी झाल्याचे प्रथमच पहायला मिळाले. ‘मोलोटोव्ह कॉकटेल’ने मारल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा चेहरा आणि हात भाजला आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही.”

विशेष म्हणजे १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून इतिहासात नोंदवला जातो. जगात ‘कामगार दिन’ साजरा करण्याची प्रथा सुमारे 137 वर्षे जुनी आहे. कामगारांनी 1877 मध्ये कामाचे तास निश्चित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. त्या दरम्यान ते जगातील विविध देशांमध्ये पसरू लागले. 1 मे 1886 रोजी संपूर्ण अमेरिकेतील लाखो कामगारांनी एकाच वेळी संप सुरू केला. 11,000 कारखान्यांतील किमान 3,80,000 कामगार त्यात सहभागी झाले. तेव्हापासूनच 1 मे हा ‘कामगार दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *