
त्वचा, चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. काही घरगुती प्रयोग करून परिणामकारक लाभ मिळवता येतो. बेसन चेहऱ्यासाठी खूप चांगले असते. बेसनाचे पीठ गुलाबपाण्यात मिसळून हा लेप चेहऱ्यास लावावा. रोज आंघोळीसाठी साबणाऐवजी बेसनाचा वापर करू शकता. सुंदर त्वचा मिळविण्यासाठी पुरेशी झोपही खूप महत्त्वाची आहे. यासाठी दररोज 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. रामदेव बाबा यांनी सांगितलेले हे उपचार आहेत.

त्वचा चमकदार ठेवण्यासाठी ‘कपालभाती प्राणायाम’ करणे चांगले आहे. यामुळे फुफ्फुसे निरोगी राहतात. फुफ्फुसात अधिकाधिक ऑक्सिजन पोहोचतो, कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. ६ महिने हा प्राणायाम केल्याने त्वचेला अप्रतिम चमक येईल. यामुळे नितळ त्वचेसोबतच चांगले मानसिक आरोग्य मिळण्यास मदत होईल. चेहरा नेहमी मऊ टॉवेलने हलकेच पुसून घ्यावा. यामुळे त्वचा मुलायम राहते. जर वेळ असेल तर आठवड्यातून एकदा तेलाने त्वचेला मालिश करा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
रोज ताज्या फळांचा रस प्यावा. यामुळे त्वचा चमकते. शरीरास पोषण मिळण्यास मदत होते. कोरफडीच्या लगद्याने चेहरा, मान आणि हातांना मसाज करावे. यामुळे त्वचेची चमक वाढेल. रात्री झोपताना जर कोरफडीने मसाज केला तर त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. आहारातही कोरफडीचा वापर करू शकता.