Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

पूर्व किनारपट्टीवर धडकणार मोचा चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आग्नेय भागात ‘मोचा चक्रीवादळ’ तयार होण्याची शक्यता आहे. ‘मोचा चक्रीवादळ’ 8 ते 11 मे दरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता असून पूर्व किनारपट्टीला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी या काळात समुद्रात उतरू नये, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने पूर्व नियोजनात्मक तयारी सुरू केली आहे. हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ असून त्याला येमेनने ‘मोचा’ हे नाव दिले आहे.

”बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात 8 मे पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ते नेमके कोणत्या दिशेला पुढे जाईल याविषयी निश्चित सांगता येत नाही. गुरुवारपर्यंत याबद्दल निश्चित समजू शकेल,” असे कोलकाता येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे हवामान संचालक जी.के. दास यांनी सांगितले.

भारतीय हवामान विभागाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 6 मेच्या सुमारास दक्षिण – पूर्व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली 7 मेच्या सुमारास त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *