स्मार्टफोन विक्री दुरुस्ती
‘स्मार्टफोन’ ही आजकाल प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. माणसे आपली सर्व कामे आता स्मार्टफोनवर करतात. भविष्यातही स्मार्टफोनची मागणी वाढणारच आहे. त्यामुळे स्मार्टफोन विक्री आणि दुरुस्ती व्यवसायाला आज फार महत्त्व आलेले आहे. आगामी काळातही या व्यवसायाच्या वाढीत कोणतीही घट होणार नाही.

भारतात 450 दशलक्षपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. बाजारात नवनवीन स्मार्टफोन येत असतात. त्यामुळे लोक खरेदी करीत असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तो नक्कीच उपयोगी आहे. जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर होत असल्याने स्मार्टफोन अनेक वेळा दुरुस्तीसाठी येतात.
आपल्या मोबाईलच्या दुकानामध्ये व्यक्तीची मोबाईलशी संबंधित समस्या पूर्ण झाली पाहिजे. म्हणजेच नवीन मोबाईल, सर्व प्रकारचे ब्रँडेड आणि अनब्रँडेड स्मार्टफोन, मोबाईलची दुरुस्ती, याव्यतिरिक्त चार्जर, इअरफोन, बॅक कव्हर, टेम्पर्ड ग्लास, डेटा केबल इत्यादी साधने आपल्याकडे असली पाहिजेत. याशिवाय आपल्याकडे कंपन्यांची सिमकार्डही असायला हवीत. मोबाईलचे दुकान उघडण्यासाठी आधी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवाना घ्यावा लागेल. आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. तुम्ही परवाना आणि नोंदणीबद्दलची सर्व माहिती ऑनलाइन मिळवू शकता आणि अर्ज देखील करू शकता.
यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते आणि ती म्हणजे तुमचे दुकान. तुम्हाला एखादे दुकान भाड्याने घ्यावे लागेल. यानंतर दुकानात फर्निचरचे काम करून घ्यावे लागेल. काही गरजेच्या वस्तू खरेदी कराव्या लागतील. ज्या कंपनीचा स्मार्टफोन तुम्हाला विकायचा आहे अशा कंपनीशी संपर्क साधून मोबाईलची ऑर्डर देऊ शकता.

याशिवाय, तुम्हाला व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी संगणक, पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेंट घेण्यासाठी स्वाइपिंग मशीन इत्यादी गोष्टींचीही आवश्यकता असेल. तुमच्या दुकानाचे स्थान बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी असले पाहिजे. याशिवाय ही गर्दी ज्या लोकांना स्मार्टफोन परवडेल अशा लोकांची असली पाहिजे.
फर्निचरमध्ये, मोबाईल दुकानासाठी सर्वोत्तम असणारे ग्लास काउंटर बनवावे लागेल. या काउंटरवर संगणक आणि प्रिंटर देखील राहिला पाहिजे, अन्यथा तुम्हाला ते नंतर विकत घ्यावे लागेल.
बाजारात अनेक ब्रँडचे स्मार्टफोन आहेत, ज्यांना बाजारात खूप मागणी आहे. तुम्ही ब्रँडेड कंपन्यांचे स्मार्टफोन विकू शकता. ज्या कंपन्यांना बाजारात नेहमीच खूप मागणी असते. यासाठी तुम्हाला असा वितरक शोधावा लागेल जो तुम्हाला फोनची डिलिव्हरी स्वस्त दरात देईल. मोबाईल शॉप व्यवसायात वितरकाशी नेहमीच चांगले संबंध असले पाहिजेत.
दुकानाबाहेर स्मार्टफोन कंपनीचे बॅनर लावू शकता. दिवाळी आणि इतर सणांमध्ये सवलतीचे बॅनर लावू शकता. तुम्ही तुमच्या मोबाइलवरून ऑनलाइन रिचार्ज करू शकता; जेणेकरून आपला ग्राहक वाढेल. याशिवाय, तुम्ही ऑनलाइन इंटरनेटच्या मदतीने तुमच्या व्यवसायाची जाहिरात सहज करू शकता.