Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

पीटर्सबर्ग संवादामध्ये हवामानावर चर्चा

जर्मनीतील ‘पीटर्सबर्ग संवाद’ या हवामान परिषदेमध्ये जगातील 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यांच्यात हवामानाशी संबंधित विषयांवर चर्चा पार पडली. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जगाला ‘हवामानासाठी एक महाकाय झेप’ घेण्याचे आवाहन केले. जर्मनीतील या वार्षिक हवामान परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

बर्लिनमध्ये सुरू झालेल्या या 2 दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी गुटेरेस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. यात 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ‘पीटर्सबर्ग संवादा’ची ही 14 वी आवृत्ती आहे. सन 2010 मध्ये बॉनच्या ‘पीटर्सबर्ग हिल’ येथून ही परिषद सुरू झाली. तिथूनच या परिषदेला नाव मिळाले. याची सुरुवात जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल यांनी केली होती. जर्मनीचे परराष्ट्र मंत्रालय ही परिषद बोलावते. यंदा ही हवामान परिषद बर्लिनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये दुबईत ‘कॉप 28’ परिषद होणार आहे.

गुटेरेस यांनी मेळाव्याला सांगितले की, पॅरिस हवामान कराराच्या उद्दिष्टात जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या वर जाण्यापासून रोखण्यासाठी जगातील देशांनी सहमती दर्शवली. यासाठी जगातील विकसित देश आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना ‘दीर्घकाळ थकीत निधी’, तसेच जीवाश्म इंधनाची सवय बदलावी लागेल.

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बियरबॉक यांनी मंगळवारी त्यांच्या भाषणात आशा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ”औद्योगिक देश त्यांचे दीर्घकाळाचे आश्वासन पूर्ण करून आर्थिकदृष्ट्या गरीब देशांना मदत करण्यासाठी पुढे येतील.”

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *