Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

ऑस्ट्रेलियात मंदिरावर पुन्हा हल्ला

ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. पश्चिम सिडनीच्या ‘रोझ हिल’ उपनगरात बाप्स स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी खलिस्तान समर्थकांनी बाप्स स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करून तोडफोड केली. यासोबतच मंदिराच्या गेटवर खलिस्तानचा झेंडा टांगण्यात आला होता. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी 24 मे रोजी ‘क्वाड’ बैठकीसाठी सिडनीला जात आहेत. शुक्रवारी मंदिर व्यवस्थापक पूजा करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना मंदिराची भिंत तोडलेली दिसली. त्याचवेळी गेटवर खलिस्तानचा झेंडाही लटकत होता.

पर्रामट्टाचे खासदार अँड्र्यू चार्लटन यांनी घटनेची माहिती मिळताच मंदिरात धाव घेतली. त्यांनी मंदिराच्या अधिकाऱ्यांसह भिंत पुन्हा रंगविण्यास मदत केली. ते म्हणाले की, या घटनेने मी खूप दु:खी असून हे धक्कादायक आहे.

चार्लटन यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. स्थानिक पोलीस, गृह व्यवहार विभाग, संसदेचे राज्य आणि फेडरल सदस्य, भारतीय उच्चायुक्तालय आणि सिडनी येथील कौन्सिल जनरल यांच्या पाठिंब्याबाबत धन्यवाद व्यक्त केले.

विशेष म्हणजे याआधीही ऑस्ट्रेलियात अनेकवेळा मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मेलबर्नमधील 3आणि ब्रिस्बेनमधील 2 हिंदू मंदिरांची खलिस्तान समर्थकांनी तोडफोड केली होती. जानेवारी महिन्यात मेलबर्नमधील बाप्स स्वामीनारायण मंदिराची तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *