Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

ब्रिटनमध्ये आजपासून राज्याभिषेक सोहळा

ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांचा आज शनिवार 6 मे रोजी राज्याभिषेक सोहळा होत आहे. चार्ल्स तिसरा आणि त्यांची पत्नी कन्सोर्ट कॅमिला औपचारिकपणे ब्रिटनचे राजा-राणी बनतील. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाबाबत नागरिकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. परंपरेपासून दूर जात, राणी कन्सोर्ट कॅमिला यांनी त्यांच्या मुकुटात कोहिनूर हिरा न घालण्याचा निर्णय घेतला आहे. शाही सूत्रांनी ब्रिटिश माध्यमांना ही माहिती दिली आहे. राजकीय संवेदनशीलता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. याचा अर्थ ब्रिटन प्रसिद्ध हिऱ्यावरील आपला दावा सोडून देत आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हा हिरा नेहमीच महिलांनी परिधान केला आहे. प्रथमच राणी व्हिक्टोरिया यांनी त्यांच्या मुकुटात घालून हा परिधान केला होता. सन 1901 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, क्वीन कॉन्सोर्ट मेरी आणि नंतर अलेक्झांड्रा यांनी तो परिधान केला. सन 1953 मध्ये, एलिझाबेथ द्वितीय यांनी तो धारण केला.

हा हिरा ब्रिटनमध्ये पोहोचण्यापूर्वी 190 कॅरेटचा होता. तो आता 105 कॅरेटचा आहे. या हिऱ्याचा पहिला उल्लेख पर्शियन इतिहासकार मुहम्मद काझिम मारवी यांनी केला आहे. इसवी सन १८ व्या शतकाच्या मध्यात नादिरशहाच्या भारतावरील आक्रमणावेळी हा हिरा भारतातून गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे भारताकडून या हिऱ्याची मागणी सातत्याने होत आहे. आजही हा हिरा कुठून सापडला यावर जाणकारांमध्ये एकमत नाही.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *