
बहुचर्चित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट मध्यप्रदेशमध्ये करमुक्त असेल. हा चित्रपट प्रबोधन करणारा आहे. मुलांनी आणि पालकांनी हा चित्रपट जरूर पहावा, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
विशेष म्हणजे ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा ‘लव्ह जिहाद’वर केंद्रित आहे. याबाबत विरोध आणि समर्थन दोन्ही आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले, की ‘केरळ स्टोरी’ दहशतवाद, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ चा भीषण चेहरा समोर आणते. क्षणिक भावनेच्या भरात ‘लव्ह जिहाद’ च्या जाळ्यात अडकणाऱ्या मुली कशा उद्ध्वस्त होतात, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटातून दहशतवाद्याचे चित्रही समोर आले आहे. दहशतवाद कसा असतो, याची जाणीव हा चित्रपट आपल्याला जाणीव करून देतो.
मध्यप्रदेशमध्ये धर्मांतराविरोधात कायदा केला आहे. जनजागृती करणारा हा चित्रपट प्रत्येकाने पहावा. पालकांनी आणि मुलांनीही पाहावा, यासाठी सरकार हा चित्रपट करमुक्त करत असल्याची घोषणा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केली.