
तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप झाल्यानंतर जगभरात सातत्याने लहानमोठे हादरे बसत आहेत. अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजली गेली असल्याचे ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ ने सांगितले. मंगळवारी अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून आग्नेय दिशेला 116 किमीवर हा भूकंप झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ३.३२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंप 120 किमी खोलीवर झाले. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, असे सांगण्यात येत आहे.
एजन्सीने सांगितले की, यापूर्वी 3 मे रोजी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. दुपारी 3.30 च्या सुमारास हा भूकंप झाला. त्याची खोली 169 किमी होती.या वारंवारच्या भूकंपामुळे रहिवाशांमध्ये मात्र भीती आहे.