Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते वाढणार

मान्सून सुरू होण्यापूर्वी मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी 5 चित्ते सोडण्यात येतील, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी सांगितले. यामध्ये 3 मादी आणि 2 नर चित्त्यांचा समावेश असेल. ‘नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ॲथॉरिटी’च्या सूचनेनुसार तज्ज्ञांच्या समुहाने ‘चित्ता प्रकल्प’च्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

पावसाळ्यात सहसा जंगलात प्राणी सोडले जात नाहीत. अशा हवामानात त्यांना अन्न आणि निवारा शोधणे खूप कठीण जाते. तसेच ते या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम नसतात. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की या चित्त्यांना ‘कुनो नॅशनल पार्क’च्या बाहेर सोडण्यास परवानगी दिली जाईल. जोपर्यंत ते धोका असलेल्या भागात प्रवेश करीत नाहीत तोपर्यंत त्यांना परत आणले जाणार नाही. सर्व चित्त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या शारीरिक हालचालींची पाहणी करून निरीक्षण पथकांद्वारे चित्त्यांची निवड करण्यात आली आहे. नामिबियातून आणलेल्या 4 चित्त्यांना आतापर्यंत कुनो पार्कमधील कुंपण असलेल्या अनुकूलीकरण भागांमध्ये सोडण्यात येऊन नंतर जंगलात सोडण्यात आले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *