Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

कर्नाटकात उद्या होणार विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार ८ मे रोजी सायंकाळी संपला. बुधवारी १० मे रोजी निवडणूक होणार असून मतदार आपला कौल देणार आहेत. निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी सत्ताधारी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावलेली दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले आहे. काँग्रेस आणि जेडीएसनेही प्रचार करण्यावर जोर दिला. जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. सोमवारी प्रत्यक्ष प्रचार थांबला असला तरी स्थानिक पातळीवर तीनही पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बुधवारी 224 सदस्य निवडण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. राज्यभरातील 58,545 मतदान केंद्रांवर एकूण 5,31,33,054 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. येथे 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष, 2,64,00,074 महिला आणि ‘इतर’ 4,927 उमेदवार आहेत. उमेदवारांमध्ये 2,430 पुरुष, 184 महिला आणि एक तृतीयपंथी उमेदवार आहे.

भाजपाने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेसने २२३ तर जेडीएसने २०७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय निवडणुकांचा अभ्यास आणि निरीक्षण करणाऱ्या ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ केले आहे

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *