Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

नांदूरमधमेश्वर अभयारण्य

नांदूर मधमेश्वेर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर अगदी मंत्रमुग्ध झालेला असतो. त्यांच्या हालचाली, त्यांचे मंजूळ आवाज आणि एकंदरच निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबर विदेश पक्षीही पाहता येतात.

हिमालय, काश्मीर, युरोप खंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, पाकिस्तान या भागांतून हजारो किलोमीटर अंतर कापून हे पक्षी येथे दाखल होतात. वन खाते आणि पक्षी निरीक्षकांनी आतापर्यंत 240 ते 250 वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे.

ब्रिटीशांनी एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ‘कडवा’ आणि ‘गोदावरी’ नदीच्या संगमावर नांदूर मधमेश्वरला एक उत्कृष्ट धरण बांधले. शंभर वर्षापासून अनेकांची तृष्णा भागवणारे हे जलाशय हजारो स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले असते. जांभळी पाणकोंबडी, लाल डोक्याची टिटवी, चक्रवाक, तरंग, वैष्णव, हळदीकुंकू, चांदवा, नयनसरी, तलवार, पांढरा शरारी, मोरशरारी मुग्धबलाक, चिमण्या, नदी सूर्य, खंड्या असे हजारो पक्षी येथे वास्तव्यासाठी असतात.

व्हिसलिंग डक, मलार्ड पोचार्ड, गढवाल, मिनटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, रिव्हर टर्न, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, इंडियन सिल्व्हर बिल, ग्रीन बिटर, कॅपविंग, ओरियन्टल, हनी बझार्ड, इंडियन रोलर, किंग फिशर, पाईड किंगफिशर, मार्शल हेरियर, स्पूनबिल, कुट, कॉमनटिल, पिग्मी गुस, ग्रेटर फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, व्हाईट नेक्ड स्टॉर्क, ओपन बिल स्टॉर्क, स्पॉड बिल डक, ब्राह्मणी डक, कोम डक, जिकाना, लेटर, असे काही विदेशी पक्षी येथे येतात.

पक्षी निरीक्षकांना या रंगीबेरंगी, मनमोहक पक्ष्यांचे मनसोक्त निरीक्षण करता यावे, त्यांच्या छबी टिपता याव्यात यासाठी वन विभागाने 5 मनोऱ्यांच्या परिसरात ‘नेचर ट्रॅक’ ची निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी कृत्रिम दगडी उंचवटे निर्माण केले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षकांच्या दृष्टीक्षेपात पक्षी येतात. येथे जायचे झाल्यास आधी नाशिकला जावे लागेल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *