
पुलित्झर पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला ‘सार्वजनिक सेवा पुरस्कारा’ सह 2 पुलित्झर पुरस्कार मिळाले. युक्रेन युद्धाच्या वृत्तांकनासाठी हा सार्वजनिक सेवेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ ला रशियाच्या घुसखोरीवरील वृत्तांकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्तांकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
दरम्यान, या पुरस्काराची सुरुवात १९१७ मध्ये झाली. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. जोसेफ पुलित्झर यांचा १९११ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाने या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे वार्ताहर कॅरोलिन किचनर यांना राष्ट्रीय वार्ताकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ मध्ये काम करत असलेल्या ईली सस्लोव यांना फिचर लेखनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
यंदा ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेचा पुलित्झर पुरस्काराच्या दोन श्रेण्यांमध्ये अंतिम फेरीत समावेश झाला आहे. सामाजिक सेवासाठी मिस्टिस्लव चेर्नोव्ह, लॉरी हिनांट, अव्हगॅनी मलोलेटका, व्हेसेलिसा स्टेपनइन्को, ब्रेकिंग न्यूजसाठी ‘दी लॉस एंजल्स टाइम्स’, शोध पत्रकारितासाठी ‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’, स्पष्टीकरणात्मक वार्ताकनकरिता ‘कॅटलिन डिकरसन’ (दी अटलांटिक), स्थानिक वार्ताकनसाठी जॉन आर्किबाल्ड, ऍशले रेम्कस, रॅमसे आर्चीबाल्ड आणि चॅलेन स्टीफन्स (एएल डॉट कॉम) आणि अण्णा वुल्फ (मिसिसिपी टुडे) यांना पुरस्कार जाहीर झाला.