Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मुलांना पोहण्यास पाठविताना

पालक मुलांच्या बाबतीत सतर्क असतात. मुलांना शिक्षणाबरोबर इतर आवश्यक कौशल्येही यायला हवीत यासाठी पालक सुट्टीत मुलांना विविध प्रशिक्षण वर्गाना पाठवितात. पोहण्याचे प्रशिक्षण हा याचाच एक भाग आहे. पोहण्यामुळे मुलांना उष्णतेपासून आराम मिळतो. त्यांच्या शारीरिक विकासातही मदत होते. पोहण्यामुळे मुलांच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पालकांनी मुलांना या वर्गात सहभागी होण्यापूर्वी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. लक्ष न दिल्यास मुलाला त्वचेशी संबंधित संसर्ग होऊ शकतो. तलावाचे पाणी नियमितपणे बदलले जाते की नाही, हे पहा. नियमांनुसार सर्व प्रथमोपचार सुविधा जलतरण तलावात असणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्या व्यक्तीला प्रथमोपचार कक्षात नेऊन गरजेनुसार प्रथमोपचार देता यायला हवेत. प्रशिक्षक कसे आहेत, हे पहायला करिता गर्दी नसलेला पूल निवडणे कधीही चांगले होईल.

मुले ज्या तलावात पोहणार आहेत, त्या पाण्यात क्लोरीनचे प्रमाण कसे आहे, हे पहावे. कधी कधी ते खूप जास्त असते. त्यामुळे मुले प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी त्वचा संसर्ग, डोळा, नाक, घसा आणि कानाची तपासणी करून घ्या. याशिवाय जर तुमच्या मुलाचे वजन सामान्यपेक्षा कमी किंवा जास्त असेल, तर डॉक्टरांकडून पोहण्यासंबंधीचा सल्ला देखील घेणे गरजेचे आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *