कांडी कोळसा निर्मिती
इंधन ही आजची जागतिक समस्या आहे. नैसर्गिक लाकडांचा वापर मानवाच्या उत्पत्तीपासून अन्न शिजवण्यासाठी आणि इतर बहुतेक उपयोगांसाठी इंधन म्हणून केला गेला. हजारो वर्षांपासून माणूस जंगलातून आणलेल्या सुक्या लाकडाचा इंधन म्हणून आजही वापर करीत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या स्वस्त आणि कायमस्वरूपी गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक कोळसा (कांडी) देखील तयार केला गेला आहे. हे प्रत्येकासाठी स्वस्त आणि आर्थिकदृष्ट्या योग्य नैसर्गिक इंधन आहे. सरकारच्या बहुतेक योजना कांडी कोळसा तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देखील देतात.

कांडी कोळसा तयार करण्यासाठी भूसा, लाकूड कोळशाची राख, शेणखत, पाने, दगडी कोळशाची भुसी, काळी माती याचे मिश्रण बनविले जाते. पूर्वी लाकडासह मानवाने शेण, भुसा, दगडी कोळसा यांसारख्या नैसर्गिक इंधनांचा वापर केला. माणूस बदलला आहे, जग बदलले आहे. आजचा आधुनिक माणूस ऐतिहासिक काळापासून झालेल्या हजारो बदलांमधून तयार झाला आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी प्राचीन काळी माणूस झाडांची पाने, जनावरांची कातडी, झाडांची साल वापरत असे. जंगलातील सुक्या लाकडांचा वापर मातीच्या दगडापासून आग बनवून इंधन म्हणून केला जात असे. मानव हजारो बदलांमधून गेला, आणि वाहतुकीसाठी, क्षेपणास्त्रांसाठी स्वयंचलित विमानांचा वापर करू लागला. अग्नीपासून ऊर्जा मिळवण्याच्या कलेत प्रगती करून आज मानवाने अणुऊर्जेचा वापर सुरू केला आहे.
जगाची लोकसंख्या खूप वेगाने वाढली. त्यामुळे अशा वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्यापासून इंधनापर्यंत सर्वच गोष्टींची नितांत गरज भासू लागली. मानवाकडून अंदाधुंद जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी मानवाला पृथ्वीच्या पोटातून नैसर्गिक तेल सापडले. आज जगातील अनेक अर्थव्यवस्था या पेट्रोल, डिझेल, पेट्रोल या नैसर्गिक इंधनावर आधारित आहेत; पण हा भूमिगत इंधनसाठा एक दिवस संपणार आहे, हे निश्चित. तेलाच्या किंमती खूप वाढल्या आहेत. आज अणुऊर्जा सामान्य माणसाच्या क्षमतेच्या बाहेर आहे. कांडी कोळसा बनविण्याची यंत्रसामग्री बाजारात विकणाऱ्या वितरकांकडे उपलब्ध आहे. भिजवलेले मिश्रण कच्चा माल म्हणून यंत्रात भरावे. कांडी कोळसा या पद्धतीने मशिनमधील डायनुसार किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराच्या डिझाईनचे डाय सेट करून गोल, कंदी, सपाट पट्टे, नळकांडी या स्वरुपात तयार करता येतात.

यंत्रसामग्रीचे उत्पादक विक्री करताना प्राथमिक प्रशिक्षण देतात. तरीही उत्पादन सुरू करण्यापूर्वी कांडी कोळसा उत्पादकांना प्रत्यक्ष काम करून प्रशिक्षित होता येईल. बाजारात इंधनाचा तुटवडा आणि पेट्रोल, डिझेल, गॅस यांसारख्या इंधनाच्या किंमती वाढत आहेत. इंधन निर्मितीचा कोणताही व्यवसाय आज तोट्यात जाऊ शकत नाही. मागणीनुसार स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध नाही रेशन दुकानातून रॉकेल जवळपास गायब झाले आहे. प्रत्येकाला गॅस खरेदी करणे शक्य नाही. 21 दिवसांनंतर गॅस मिळत असल्याने, 21 दिवसांपूर्वी गॅस टाकी संपली तर पर्याय काय? मग जेवण बनवणार कसे? त्याच्यासाठी कांडीदी कोळसा आणि शेगडी हेच पर्याय आहेत. यामुळे किमान इंधन निर्मिती उद्योगांना ग्राहक शोधावे लागत नाहीत. पाने, शेण, माती, ज्वलनशील पदार्थाचा भुसा, दगडी कोळशाचा भुसा, लाकूड कोळशाची राख, लाकडाचा भुसा, भात किंवा गव्हाचा भुसा, असे सर्व ज्वलनशील भाग किंवा सर्व ज्वलनशील वस्तू इ. कच्चा माल यासाठी लागतो. स्वयंचलित कांडी कोळसा तयार करणारे यंत्र, मोठा ग्राइंडर, कटर, 2 मोटार, वेष्टनबंद करण्याचे यंत्र अशी यंत्रसामग्री यासाठी लागते.