
जपानी दुचाकी होंडाने नुकतीच नवीन ‘कॉम्यूटर बाइक होंडा शाइन १००’ प्रदर्शित केली आहे. लवकरच या दुचाकीची डिलिव्हरी सुरू होणार आहे. कंपनीने कर्नाटकच्या ‘नरसापुरा’ येथील प्रकल्पामध्ये या बाइकचे उत्पादन सुरू केले आहे.
‘होंडा शाइन १००’ ही ५ रंगांमध्ये मिळणार आहे. निळा-काळा, सोनेरी-काळा, लाल-काळा, राखाडी-काळा, हिरवा-काळा अशा रंगसंगतीमध्ये या दुचाकी उपलब्ध आहेत. ‘होंडा शाइन १००’ चा साज आणि डिझाइनमध्ये नवीन डायमंड फ्रेम दिले आहे. याच्या सीटची हाइट 786 मिमी. आहे. या मोटरसायकलचे वजन ९९ किलोग्रॅम असून इंधन टाकीची क्षमता ९ लीटर आहे. शाइन १०० मध्ये हॅलोजन हेडलँम्प, वेगळ्या डिझाइनच्या इंधन टाक्या, ब्लॅक फिनिशचे अलॉय व्हील आणि साइड स्टँड इनहिबिटर आणि टेललँम्प्स आहे.

होंडाच्या या बाइकला भारतात सर्वात जास्त मागणी आहे. होंडाने किंमतीकडे खास लक्ष ठेवले आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ६४ हजार ९०० रुपये आहे. होंडाची नवीन बाइक शाइन १०० मध्ये सिंगल सिलिंडर वातानुकुलीत इंजिन दिले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ‘शाइन १००’ मायलेजमध्ये जबरदस्त आहे. कंपनीकडून मायलेजचा आकडा समोर आला नाही.