
राजस्थानमधील आबू रोड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आवारातील शांतीवन परिसरात सुपर स्पेशालिटी चॅरीटेबल ग्लोबल रुग्णालयाचे कोनशीला पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते शिवमणी वृद्धाश्रम आणि परिचारिका महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचा कोनशीला समारंभही पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, ”आरोग्यविषयक सुविधांच्या बाबतीत देश एका परिवर्तनातून जात आहे. गेल्या नऊ वर्षात देशातील प्रत्येक नागरिकाला रुग्णालयांची सुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहे ही जाणीव झाली आहे. यात ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा मोलाचा वाटा आहे. या योजनेचा आतापर्यंत 4 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. जनऔषधी केंद्रांवर मिळणाऱ्या स्वस्त औषधांमुळे सुमारे 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली. गेल्या 9 वर्षांत सरकारने डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर केली आहे.”
देशात दर महिन्याला सरासरी एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आल्याचे मोदी यांनी पुढे सांगितले.