
फ्रान्स कार कंपनी ‘रेनो’ ने बाजारात ‘रेनो डस्टर’ चे अपडेटेड मॉडेल आणण्याची तयारी केली आहे. ज्या गाडीला जबरदस्त साज आणि नवीन फीचर्ससोबत हायब्रिड पॉवरट्रेन असणार आहेत.
‘रेनो’ कंपनीने सन २०१२ मध्ये ‘डस्टर’ ला भारतीय बाजारात आणले होते. आता ११ वर्षानंतर याचे आगामी अत्याधुनिक मॉडेल प्रदर्शित केले जावू शकते. परंतु, कंपनीने यासंबंधी अद्याप कोणतीही खास माहिती दिली नाही. सध्या माध्यमांच्या हवाल्याने काही माहिती समोर येत आहे.

नेक्स्ट जनरेशन रेनो डस्टरचा साज आणि फीचर्स यामध्ये ऑल इंडिया एलईडी लाइट सेटअप सोबत पॉवरफुल बंपर आणि जबरदस्त डिझाइन लँग्वेज पाहायला मिळतील. नवीन ‘रेनो डस्टर’ मध्ये वेंटिलेटेड सीट्स, पॅनारमिक सनरूफ, मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एरर प्यूरिफायर, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, ईएससी आणि अन्य आवश्यक स्टँडर्ड फीचर्स सोबत मल्टीपल एअरबॅग्स आणि ड्रायव्हर असिस्टेंट्स सिस्टीम पहायला मिळू शकते. ‘नेक्स्ट जनरेशन रेनो डस्टर’ एसयूव्हीला हायब्रिड पॉवरट्रेन सोबत आणले जाऊ शकते. यात १.२ लीटर ते १.५ लीटरपर्यंत इंजिन पहायला मिळू शकते. या माहितीमुळे वाहन शौकिनांमध्येही गाडी येण्याबाबत कमालीची उत्कंठा आहे.