
‘मार्वल स्टुडिओज’चा ‘ॲण्ट-मॅन अँड द वॅस्प : क्वांटमॅनिया’ हा सुपरहिट चित्रपट फेब्रुवारीमध्ये चित्रपटगृहामध्ये यशस्वीरित्या प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ वर १७ मे ला प्रदर्शित होणार आहे. ‘अँट-मॅन’ आणि ‘वेस्प’चे थरारक साहस यामध्ये दिसणार आहे. त्यांच्या क्वांटम प्लेनच्या शोधात ते आहेत. ‘ॲण्ट-मॅन अँड द वॅस्प : क्वांटमॅनिया’ हा सन २०२३ चा अमेरिकेतील सुपरहिरो चित्रपट आहे. यामध्ये स्कॉट लँग, अँट-मॅन आणि होप पिम ही पात्रे आहेत.
‘मार्वल स्टुडिओ’ द्वारे निर्मित आणि वॉल्ट डिस्ने स्टुडिओ मोशन पिक्चर्सद्वारे वितरीत केलेला हा चित्रपट आहे. जेफ लव्हनेस लिखित आणि पीटन रीड दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पॉल रुड यांनी ‘स्कॉट लँग’ आणि इव्हॅन्जेलिन लिली यांनी ‘होप व्हॅन डायन’च्या भूमिकेत काम केले आहे. जोनाथन मेजर्स, कॅथरीन न्यूटन, डेव्हिड डस्टमाल्चियन, केटी ओब्रायन, विल्यम जॅक्सन हार्पर, बिल मरे, मिशेल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात, लँग, व्हॅन डायन आणि त्यांच्या कुटुंबाला ‘कांग द कॉन्करर’ (मेजर्स) चा सामना करण्यासाठी ‘क्वांटम’ क्षेत्रात नेले जाते. इथुन पुढचा प्रवास सुरु होतो.

‘ॲण्ट-मॅन अँड द वॅस्प : क्वांटमॅनिया’ चा प्रीमियर लॉस एंजेलिसमध्ये 6 फेब्रुवारी 2023 रोजी झाला. पाचव्या टप्प्यातील पहिला चित्रपट म्हणून 17 फेब्रुवारी 2023 रोजी युनायटेड स्टेट्समध्ये तो प्रदर्शित झाला. याला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. या चित्रपटाने जगभरात 475 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. 2023 चा चौथा-सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट बनला आहे. आता हा ‘डिज्नी प्लस’वर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.