
आगामी ‘जवान’ हा हिंदी चित्रपट सप्टेंबर 2023 ला प्रदर्शित होत आहे. ऍटली यांनी याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सप्टेंबर 2021 मध्ये पुणे, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, राजस्थान आणि औरंगाबाद येथे चित्रीकरणाने सुरुवात झाली. यामध्ये शाहरुख खानची दुहेरी भूमिका दिसेल.
अनिरुद्ध रविचंदर यांनी याद्वारे एकल संगीतकार म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी यापूर्वी ‘डेव्हिड’ साठी संगीत दिले होते. योगी बाबू एका दशकानंतर खानसोबत पुन्हा एकत्र आला आहे. त्याची शेवटची भूमिका ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये खानच्या विरुद्ध होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, राजस्थान आणि औरंगाबाद येथे झाले आहे.

या चित्रपटात शाहरुख खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्री नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर देखील कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. साऊथचा दिग्दर्शक एटली कुमारही या चित्रपटाद्वारे हिंदी दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. अभिनेत्री दीपिकाही दमदार भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या निर्मात्या गौरी खान आहेत.