
रशियाच्या आक्रमणाविरूद्ध युक्रेनला युद्धकार्यात मदत करण्यासाठी ब्रिटन लांब पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे युक्रेनला पाठवीत असल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन युक्रेनला ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्रे देत आहे. ‘स्टॉर्म शॅडो’ मध्ये लांब पल्ल्यांवरील लक्ष्यांना सामील करण्याची क्षमता आहे. त्याची मारक क्षमता 250 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हे विमानातून उडवले जाऊ शकते.
ब्रिटनने म्हटले आहे की, या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यामुळे युक्रेनला त्याच्या प्रदेशातून रशियन सैन्याला मागे ढकलण्यास मदत होईल. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ ला दिलेल्या निवेदनात संरक्षण सचिव वॉलेस यांनी ब्रिटनने युक्रेनला ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्रे दिली असल्याचे घोषित केले. वॉलेस म्हणाले, ” ‘युक्रेनला हल्ल्यापासून बचाव करण्याचा अधिकार आहे. ‘स्टॉर्म शॅडो’चा वापर करून युक्रेन आपल्या सार्वभौम प्रदेशातून रशियन सैन्याला मागे ढकलेल. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की गेल्या वर्षी देशात संघर्ष सुरू झाल्यापासून अशा शस्त्रांची मागणी करीत आहेत, परंतु त्यांच्या आंतरराष्ट्रीय समर्थकांनी लांब पल्ल्याची शस्त्रे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कटुता वाढेल असे त्यांना वाटले; परंतु रशिया जाणीवपूर्वक नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करीत असल्याने पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हा निर्णय घेतला आहे.”

“यावर्षी रशियन नेतृत्वाने बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे नागरिक व नागरी पायाभूत सुविधांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले आहे. मागील 6 महिन्यांच्या तुलनेत जानेवारीमध्ये अधिक रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले आहे,” असे वॉलेस म्हणाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वॉलेस यांनी त्यांचे रशियन समकक्ष सर्गेई शोइगु यांना पत्र लिहून इशारा दिला होता की, जर असे आणखी हल्ले झाले तर ब्रिटन युक्रेनला आणखी घातक शस्त्रे देऊ शकेल.