Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज दिनांक १३ रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. दुपारनंतर 224 आमदारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस या 3 प्रमुख पक्षांमध्ये ही लढत झाली आहे.

सन 2018 च्या निवडणुकीत भाजप 104 जागा जिंकणारा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. केवळ 80 जागा मिळविणाऱ्या काँग्रेसने एच.डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएसशी युती केली, ज्याने 37 जागा जिंकल्या आणि राज्यात युतीचे सरकार स्थापन केले. काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी आघाडी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यानंतर मध्यंतरी भाजपने सरकार स्थापन केले.

यावेळी राज्यात विक्रमी ७३.१९ टक्के मतदान झाले. नवमतदारांबरोबर ज्येष्ठ मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी झंझावाती प्रचार केला. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी आणि आणि प्रियंका गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांभाळली. गेल्या वर्षी राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला कर्नाटकात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचाही फायदा होण्याची पक्षनेतृत्वाला आशा आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *