Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

नागपूर परिषदेत कामगारांच्या विषयांवर चर्चा

‘जी २०’ अंतर्गत भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ क्षेत्रातर्फे शुक्रवारी नागपूरमध्ये एकदिवसीय कामगार परिषद घेण्यात आली. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल, तसेच भारतीय मजदूर संघाचे महासचिव रवींद्र हिमटे सन्माननीय अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.

‘ई श्रम’ पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील जवळपास २८ कोटी कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. स्थलांतरित कामगारांनाही सुरक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल यांनी यावेळी सांगितले.

या परिषदेत कामगारांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा, आंतरराष्ट्रीय प्रवासी कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा या विषयांवर व्यापक चर्चा झाली. परिषदेत कामगारांसंबंधी योजना राबविलेल्यांचा अनुभव, सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, आंतरराष्ट्रीय कामगार आणि सामाजिक निधीचा योग्यतेने वापर यावर 3 सत्रात चर्चा झाल्याचे भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रांताच्या अध्यक्ष शिल्पा देशपांडे यांनी सांगितले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *