सुधा मूर्तींचे चित्रपटवेड

‘इन्फोसिस फाऊंडेशन’ च्या संस्थापिका सुधा मूर्ती या समाजसेवा, लेखन, उद्योग, अध्यापन अशा विविध क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तिमत्व असून वाचनाची आवड असणाऱ्या गृहिणींच्याही मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. अत्यंत हुशार आणि यशस्वी उद्योजिका असलेल्या सुधा मूर्ती अलिकडे ‘द कपिल शर्मा शो’ कार्यक्रमात सहभागी झाल्या.

अतिशय साधेपणाने आयुष्य जगणाऱ्या सुधा मूर्तींनी हसतखेळत दिलखुलास गप्पा केल्या. यावेळी त्यांच्याबरोबर रविना टंडन आणि ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ माहितीपटाच्या निर्माता गुनीत मोंगा देखील सहभागी झाल्या होत्या. सुधा मूर्ती यांना चित्रपटाविषयी असलेले प्रेम पाहून रसिक भारावून गेले.
सुधा मूर्ती यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्या म्हणाल्या, ”मी खूप चित्रपट पाहिले आहेत. मी जेव्हा पुण्यात होते, तेव्हा कुणी तरी माझ्याशी रोज सिनेमा पाहण्याची पैज लावली. मग त्यानुसार मी ३६५ दिवस रोज एक सिनेमा पाहिला.”

सुधा मूर्ती यांच्यावर त्या वापरीत असलेल्या कपड्यांवरून टीका केली जायची. सुधा मूर्ती उद्योग क्षेत्रातील कार्यक्रमांनासुद्धा साधेपणाने जातात. सुरुवातीला मात्र तिथे उपस्थित लोकांनी वाईट पद्धतीने त्यांच्याकडे पहिले असल्याचे त्या म्हणाल्या.
सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तके असून सर्व पुस्तके यशाच्या शिखरावर पोहोचली. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील स्त्री पात्रे सक्षम असतात. त्या आपल्या निर्णयांवर ठाम असतात.