टॅल्कम पावडर निर्मिती
टॅल्कम पावडर म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पांडा, हिमानीसारखे प्रसिद्ध ब्रँडेड डबे येतात. या ब्रँडनी देशातील बहुतांश बाजारपेठ काबीज केली आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी वापरल्या जाणार्या टॅल्कम पावडरसारखी उत्पादने त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर बाजारात विकली जाऊ शकतात. आपणास हा पावडर निर्मिती उद्योग करायचा असल्यास सुप्रसिद्ध ब्रँडशी स्पर्धा करताना आपणास आपली उत्पादने विकावी लागतील. या दृष्टिकोनातून चांगल्या दर्जाची उत्पादने बनवावी लागतील. प्रत्येकाला स्वतःला सुंदर दिसावे, असे वाटत असते. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांवर पैसे खर्च करताना पैशाचा विचार केला जात नाही.

पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये, त्यांच्या उत्पादनात आणि विक्रीमध्ये पहिला क्रमांक टॅल्कम पावडरचा असल्याचे दिसते. ते वापरण्याची पद्धतही खूप सोपी आहे. पावडरच्या डब्यातून पावडर तळहातावर घ्यावी, आणि चेहऱ्याला लावावी, पावडर व्यवस्थित लागली की नाही यासाठी चेहरा आरशात पहावा, हे चालत आलेले आहे. अशी चालता-बोलता सहजपणे वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने सर्वांनाच आवडतात.
उष्णता किंवा सूर्यप्रकाशाच्या प्रभावाने चेहऱ्याची त्वचा काळी पडू नये, म्हणून टॅल्कम पावडरचा वापर केला जात असे. घरातील पुरुष इतर कोणतेही सौंदर्यप्रसाधने वापरत नसले तरी नोकरीनिमित्त घराबाहेर पडताना चेहऱ्यावर किमान टॅल्कम पावडर तरी लावतात, ही वस्तुस्थिती आहे.

लहान मुलांना उन्हाळ्यापासून वाचवण्यासाठी अनेक वेळा पावडर लावतात. टॅल्कम पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल अतिशय बारीक पावडरमध्ये तयार केला जातो. दळताना त्यात सुगंध मिसळला जातो. ही पावडर बहुधा छोट्या किंवा मोठ्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये वेष्टनबंद करून त्याचे नाव असलेले स्टिकर लावले जाते, आणि विक्रीसाठी आणले जाते. ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940’ नुसार सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी मंजुरी घ्यावी लागेल. तज्ञांकडून टॅल्कम पावडर बनवण्याचे सूत्र मिळवावे. देशातील प्रत्येक व्यक्ती हा टॅल्कम पावडरचा ग्राहक आहे. किराणा दुकाने, सौंदर्य प्रसाधनांची दुकाने, औषधांची दुकाने, मॉल्स, बाजार, प्रदर्शने, स्टेशनरी दुकाने, ब्युटी पार्लर अशा सर्व ठिकाणी टॅल्कम पावडरचे ग्राहक आहेत.
घरोघरी विपणन करून टॅल्कम पावडरची चांगली विक्री होत असल्याने ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी विपणन करून उत्पादनाची विक्री करण्यासाठी विक्री प्रतिनिधी नियुक्त करा. टॅल्कम पावडरसाठी टायटॅनियम डायऑक्साइड, झिंक ऑक्साईड, कॅल्शिअम कार्बोनेट हा कच्चा माल असतो. तसेच स्वयंचलित मोठे ग्राइंडर, मिक्सर, फिल्टर चाळणी, पॅकिंग मशीन आणि इतर उपकरणे इत्यादी यंत्रे आवश्यक असतात.