Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

महिंद्राच्या केयूव्ही १०० ची प्रतीक्षा

‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनी आगामी काळात आपली स्वस्त विजेवर चालणारी गाडी ‘केयूव्ही १००’ प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. ‘ऑटो एक्सपो’ मध्ये जेव्हापासून लोकांनी महिंद्राची ही ‘केयूव्ही १००’ पाहिली आहे, तेव्हापासून ती कधी बाजारात येते याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, विजेवर चालणारी गाडीमध्ये उच्च क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. सिंगल चार्जवर बॅटरी रेंज २०० किमीहून जास्त असू शकते. यात ४० बीएचपीची जास्तीत जास्त उर्जा आणि १२० न्यूटन मीटरचे पिक टॉर्क जनरेट करू शकणारी ४० किलोवॅटची विजेवर चालणारी मोटर असू शकते. या विजेवर चालणाऱ्या गाडीला तुम्ही तुमच्या घरी एसी चार्जच्या मदतीने ६ तासाहून जास्त वेळेत फुल चार्ज करू शकता. यात डीसी फास्ट चार्जिंग सुविधा मिळू शकते. ज्याद्वारे तुम्ही एका तासात ८० टक्क्यांहून जास्त चार्ज करू शकता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विजेवर चालणाऱ्या गाडीला मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे कंपन्या १० लाख रुपयापेक्षा कमी किंमतीत स्वस्त गाडी आणण्याची तयारी करीत आहेत.

‘ऑटो एक्सपो 2020’ मध्ये महिंद्रा ‘ईकेयूवी100’ चे जे प्रोटोटाइप दिसत होते. ते दिसायला खूप आकर्षक होते. वैशिष्टेमध्ये ही ‘टाटा टियागो’ पेक्षा चांगली असू शकते. यात मोठी स्क्रीन आणि स्मार्टफोन कनेक्टिविटीसह खूप नवीन फीचर्स पहायला मिळू शकतात. महिंद्राने गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत पहिली विजेवर चालणारी गाडी ‘एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही ४००’ प्रदर्शित केली होती. जी लूक आणि फीचर्ससोबत पॉवर आणि रेंजमध्ये जबरदस्त आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *