Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

स्वस्त दरात घ्या वातानुकूलित यंत्र

तापमान प्रचंड वाढले असून कडक उन्हाळा सुरु आहे. पारा चाळीशीच्या पार गेला असून साहजिकच अनेकजण नवीन वातानुकूलित यंत्र खरेदी करण्याच्या विचारात नक्कीच असतील. सध्या बाजारात ‘व्होल्टास’ चे इन्व्हर्टर वातानुकूलित यंत्र खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. यावर ५५ टक्के सवलत दिली जात आहे. यानंतर या एसीची किंमत अर्धी होते. जर तुम्हाला स्वस्त किंमतीत यंत्र खरेदी करायचे असेल, तर तुमच्यासाठी हा चांगला व्यवहार ठरू शकतो.

हे यंत्र इन्वर्टर कंप्रेसर सोबत येते. यात उष्णतेनुसार ऊर्जा कमी जास्त होते. यात ४ कूलिंग मोड दिले आहेत. याची क्षमता ०.८ टनची आहे. हे ५२ डिग्रीत थंडावा देते. या यंत्राला वार्षिक २७२० यूनिट्स वीज लागते. यासोबत १ वर्षाची वॉरंटी, १० वर्षाची इन्वर्टर कंप्रेसर वॉरंटी दिली जात आहे. सोबत कॉपर कंडेसर कॉइल सुद्धा उपलब्ध आहे. हे यंत्र मध्यम आकाराच्या खोलीसाठी एकदम योग्य आहे.

‘व्होल्टास’ 0.8 टीओएन ॲडजस्टेबल इन्व्हर्टर स्पिल्ट एसी’ हा ३ स्टार एसी आहे. याची क्षमता 0.8 टन आहे. यात 4 इन 1 ॲडजस्टेबल मोड दिले आहेत. याची खरी किंमत ५४ हजार ९९० रुपये आहे. यावर ५५ टक्के फ्लॅट डिस्काउंट असल्याने आपण २४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. ईएमआयवर सुद्धा खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दर महिना ११९४ रुपये द्यावे लागतील. जुने यंत्र द्यायचे असेल, तर तुम्हाला २२८० रुपयांपर्यंत सवलत दिली जाऊ शकते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *