Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मुंबईतील रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे प्रदान

मुंबईत महाराष्ट्र परिक्षेत्राच्या टपाल विभागात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्नसिंग कुलस्ते यांची उपस्थिती होती. यावेळी नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. रोजगार मेळावा या उपक्रमांतर्गत १० लाख नोकऱ्या पुरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून येत्या काही वर्षांत ते पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे कुलस्ते यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्याला महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन लोढा यांनी करून नवनियुक्त उमेदवारांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आली.

केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना राज्यमंत्री फग्नसिंग कुलस्ते आणि  मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. नियुक्तीपत्रे मिळालेल्या उमेदवारांनी यावेळी समाधान व्यक्त केले

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *