Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

केसगळतीला वेळीच थांबवा

केस गळणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. या समस्येवर वेळीच उपचार करणे फार महत्त्वाचे आहे; अन्यथा कमी वयात डोक्यावर टक्कल पडते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी काहीजण भरपूर पैसे खर्च करतात. ही समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपचार फायदेशीर ठरतात. तरीही ते करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.

लोह हे एक शरीरातील एक आवश्यक पोषकतत्व आहे. ते शरीरात रक्त तयार करण्यासाठी मदत करते. रक्ताच्या कमतरतेमुळे केस गळणे कमी होऊ शकते. याकरिता लोहयुक्त पदार्थांचे अधिकाधिक सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. ब्रोकोली, हिरव्या भाज्या यामधून लोह मिळते. लोहाच्या गोळ्या घ्यायच्या असतील तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. लोहाची मात्रा अधिक झाल्यास बद्धकोष्ठता किंवा उलट्या अशा समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे अति सेवनही करू नये.

केस गळणे थांबविण्यासाठी काही डॉक्टर ‘बायोटिन’ घेण्याचा सल्ला देतात. बायोटिन त्वचेसाठी फायदेशीर आहे. अंडी, गहू किंवा मशरूम अशा पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात बायोटिन असते. भोपळ्याच्या बियांचे तेल रोज सेवन केल्यास केस गळण्याची समस्या कमी होते. यामुळे तुमचे केस गळणे थांबू शकते. कांद्याच्या रसामध्ये असलेले सल्फर केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. अनेक तज्ज्ञ केसांसाठी कांद्याचा वापर करण्याचा सल्ला देतात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *