मुंबईतील घरांसाठी म्हाडाकडून जाहिरात
मुंबईतील 4083 घरांसाठी म्हाडाकडून येत्या सोमवारी २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून 18 जुलै रोजी सोडत काढण्यात येईल. यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. वर्षभरापासून या सोडतीची चर्चा सुरु होती. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरीवली, मालाड, दादर परिसरात ही घरे असणार आहेत.

या घरांमध्ये अत्यल्प गटातील 2788, मध्यम गटातील 132, उच्च गटातील 38, विखुरलेली 102 अशी घरे असणार आहेत. 22 मे पासून नोंदणी करता येणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. रंगशारदा, वांद्रे, पश्चिम येथे घरांची सोडत 18 जुलै 2023 रोजी काढण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून असून त्यानंतर स्वीकृती अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल. अल्प गटासाठी गोरेगाव येथे घरे असून या घरांच्या किमती साधारण 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत आहेत. पहाडी भागातील घरांची किंमत साधारण 30 ते 44 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे. मध्यम गटासाठी दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर) कांदिवली येथे घरे आहेत. उच्च गटासाठीची घरे ताडदेव, लोअर परळ, शीव (सायन), शिंपोली, तुंगा पवई येथे आहेत.