Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

आर्या आंबेकरचे रूप सजलया

अनेक वेळा चित्रपटातील कथेऐवजी चित्रपटातील गाणी गाजतात. असेच एक आर्या आंबेकर हिने गायलेले गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला समाजमाध्यमांवर उदंड प्रतिसाद मिळत आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असते. पण ते प्रेम यशस्वी होतेच असे नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण आगामी ‘गेट टुगेदर’ हा चित्रपट करून देणार आहे. या चित्रपटाचे नवे गाणे प्रदर्शित झाले असून तरुण मंडळींच्या पसंतीस उतरत आहे.

‘रूप सजलया’ हे नवे गाणे आर्या आंबेकर आणि अजय रणपिसे यांनी गायले आहे. गाण्यातील शब्द, श्रवणीय संगीत, आर्या आंबेकर-अजय रणपिसे यांचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. त्यामुळे या गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली, गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या प्रदर्शित केलेल्या गाण्यांना समाजमाध्यमातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *