Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

अवतार: द वे ऑफ वॉटर

जगभरातील बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या ७ जूनला प्रदर्शित होणार आहे. जगभरात चित्रपटाने बक्कळ कमाई केली. आता हा चित्रपट ‘डिझ्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४०.३ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाने जगभरात २.२८ बिलियन डॉलरची कमाई केली आहे. या चित्रपटाचे निर्मितीमूल्य तब्बल २५० मिलिअन डॉलर्स, अर्थात २००० कोटी रुपये होते. या चित्रपटाचे आणखी ५ भाग २०२८ पर्यंत प्रदर्शित होणार आहेत. याचा पहिला भाग सन २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता तब्बल १३ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा अमेरिकेचा विज्ञानकथापट आहे. जेम्स कॅमेरॉन यांनी याचे दिग्दर्शन केले. कॅमेरॉनने जॉन लँडाऊ सोबत त्याची निर्मिती केली. सर्वोत्कृष्ट चित्रासह अनेक अकादमी पुरस्कारांसाठी नामांकित असा हा चित्रपट आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *