
तरुणाईला निश्चितपणे आवडेल असा ‘दिल बेधुंद’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आज 19 मे 2023 ला महाराष्ट्रातील 120 चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित झाला. हा चित्रपट गूढ आणि ट्विस्टने भरलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष फुंडे यांनी केले आहे. यात हंसराज जगताप, साक्षी चौधरी, जयेश चंद्रकांत चव्हाण आणि आरती कुठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचे तर राजू वयाने मोठा असूनही जान्हवीच्या प्रेमात आहे. त्याने ‘प्रपोज’ केल्यावर जान्हवीने राजूला पूर्ण गावात दहावीच्या परीक्षेत ‘टॉप’ येण्याची अट ठेवते. त्याप्रमाणे राजू परीक्षेत ‘टॉप’ येतो, तेव्हा जान्हवी त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगते. तो पुढे असे काय करतो, की त्यामुळे जान्हवीचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त होते ! या प्रश्नाच्या उत्तरासाठी चित्रपटगृहात जाऊन ‘दिल बेधुंद’ पहावा लागेल.

या चित्रपटाचे संगीत स्वप्नील शिवणकर यांनी के. स्वामी यांच्या गीतांवर दिले आहे. ‘सिट्टी मार’ तसेच ‘या मनात उडतय पाखरू’ ही गाणी तरुणाना आवडू लागली आहेत. हंसराज आणि साक्षी या मुख्य जोडीशिवाय या चित्रपटात जयेश चव्हाण आणि आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धीरज तरुणे आणि गोविंद चौरसिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.