Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

नाशिकमध्ये होणार इलेक्ट्रॉनिक क्लस्टर

नाशिकमध्ये औद्येागिक गुंतवणुकीला पोषक वातावरण आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकास साधत असताना येथे इलेक्ट्रीक-इलेक्ट्रॉनिक क्लस्टर साकारले जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याबरोबर उद्योजकांनी बैठक घेवून या क्लस्टरसाठी जागा निश्चित करावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांना केले.

‘निमा’ या उद्योजक संघटनेच्या वतीने सातपूर येथे ‘निमा पॉवर २०२३’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिंडोरी-घोटी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विस्तारीकरणासाठीही विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यात १२ हजार ३६० नवे उद्योग तयार झाले असून या वर्षभरात २५ हजार उद्योग निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *