Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

दोन हजार रुपयांची नोट चलनबाह्य होणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने आता 2000 रुपयांच्या नोटा चलनात नसल्याचे शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ग्राहक 23 मे पासून बँकेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकतात. 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्यात आली आहे, मात्र ती कायदेशीर निविदाच राहणार आहे. 2000 रुपयांची ही नोट नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आली होती. एका वेळी फक्त 20,000 रुपयांची देवाणघेवाण करता येणार आहे. या नोटा ग्राहक सप्टेंबरपर्यंत बदलू शकतात. तोपर्यंत या नोटांच्या सहाय्याने बाजारात खरेदी-विक्री करता येऊ शकते. ‘आरबीआय कायदा 1934’  च्या कलम 24 (1) अंतर्गत 2 हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. पुढे 2018-19 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.

आरबीआयने म्हटले आहे की, लोक त्यांच्या बँक खात्यांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. किंवा ते या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेतही जाऊ शकतात. कोणत्याही निर्बंधांशिवाय सामान्य पद्धतीने बँकांमध्ये या नोटा जमा केल्या जाऊ शकतात. 23 मे 2023 पासून बँकांमध्ये जाऊन 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता. सर्व बँका 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून देतील.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *