Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

आईस्क्रीम खा जपून

उन्हाळ्यात थंड पदार्थांची मागणी खूप वाढते, मग ते थंड पेय असो किंवा आईस्क्रीम! बहुतेक लोकांना असे वाटते की, थंड पदार्थ खाल्ल्याने शरीर थंड होते. मात्र असे अजिबात नाही. आईस्क्रीम खाऊन काही काळ शरीरात थंडी जाणवते; पण आईस्क्रीम तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत असते, हे माहीत असायला हवे. जर तुम्ही जास्त आइस्क्रीम खात असाल, तर काळजी घ्या.

आईस्क्रीममध्ये वेगवेगळे फ्लेवर्स, दूध, चॉकलेट, चेरी आणि ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो, ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

जास्त आईस्क्रीम खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. इतकेच नाही, तर पोटाची चरबीही वाढू शकते. जर तुम्ही ती वेळीच टाळली नाहीत, तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. दिवसातून 2-3 वेळा आईस्क्रीम खाल्ले, तर तुम्ही 1000 पेक्षा जास्त कॅलरीज सेवन केले आहे. रोज आईस्क्रीम खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढेल, ज्यामुळे लठ्ठपणासोबतच अनेक शारीरिक समस्या निर्माण होतील. म्हणून आईसक्रीम खा पण जरा दमाने !

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *