सवलतीत घ्या वन प्लसचे स्मार्टफोन

सध्या बाजारामध्ये अनेक स्मार्टफोन ब्रँडचा बोलबाला असला तरीही ‘वन प्लस’ कंपनीच्या स्मार्टफोनने वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ ॲपल’ नंतर ‘वनप्लस’ चे फोन ‘प्रिमीयम दर्जाचे फोन’ म्हणून सुपरिचित झाले आहेत. ‘वन प्लस’ कंपनी तिच्या मिड रेंज फोन ‘मीडिया टेक डायमेन्सीटी ८१००-मॅक्स प्रोसेसर आणि 12 जीबी पर्यंत रॅम असलेल्या फोनवर आता मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ज्यामुळे ४० हजार रुपये किंमतीचा हा फोन ॲमेझॉनवरून अवघ्या २९ हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये 120 हर्टझ डायनॅमिक रिफ्रेश दरासह ६.७ इंच फुल एचडी प्लस ॲमोल्डेड डिस्प्ले आहे.

डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120 हर्टझ आहे आणि डिस्प्लेवर 2.5 डी गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स 766 सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. फोनमध्ये 4500 एमएएच ड्युअल सेल बॅटरी आणि 150 वॅट सुपर फ्लॅश फास्ट चार्जिंगसह दिली आहे.

‘वन प्लस’ 10आर’ चे बेस मॉडेल 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल सध्या ॲमेझॉनवर ३४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ई-कॉमर्स संक्र्तस्थळ ॲमेझॉन फोनवर ४ हजार रुपयांची सवलत देत आहे. त्यानंतर फोनची किंमत ३०,९९९ रुपये होईल. याव्यतिरिक्त, एचडीएफसी कार्ड आणि इएमआयने पेमेंट करणारे ग्राहक १,५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. सर्व ऑफर्ससह, फोनची किंमत २९,४९९ रुपयांपर्यंत जाते. एवढेच नाही, तर फोनवर २२,५०० पर्यंतची अदलाबदल सवलत देखील उपलब्ध आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *