Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

सीबीएसई बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये बदल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढील वर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या पॅटर्नमध्ये अनेक बदल केले आहेत. यावर्षी सीबीएसई बोर्डाचा १०वी आणि १२वीचा निकाल १२ मे २०२३ रोजी जाहीर झाला. निकालासोबतच पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून होणार आहेत. परीक्षेपूर्वी नमुना पेपर सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर जारी केला जातो. सीबीएसईने पुढील वर्षासाठी बदललेला परीक्षेचा पॅटर्न जाहीर केला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतील. गतवर्षीप्रमाणे पेपरची रचना केली जाणार असली, तरी दीर्घ उत्तरे आणि लहान प्रश्न देखील असतील. त्याचबरोबर केस स्टडीवर आधारित प्रश्नही विचारले जातील.

सीबीएसई बोर्ड परीक्षेचा नमुना पेपर याप्रमाणे डाउनलोड करा :

नमुना पेपर तपासण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in ला भेट द्यावी लागेल.
मुख्यपृष्ठावरील नमुना प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर जा.
त्यानंतर बारावी/दहावी नमुना प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करा.
पुढील पानावर तुम्ही विषयनिहाय नमुना पेपर पाहू शकता.
पेपर पीडीएफ स्वरूपात उघडेल.
पेपर तपासल्यानंतर हवी असल्यास त्याची प्रिंट काढा.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *