Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आजपासून 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात पोहोचणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान प्रचंड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.

डिसेंबर 2022 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा हा पहिला द्विपक्षीय विदेश दौरा असेल. त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात येणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यात प्रचंड हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत.

पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ 2 जून रोजी मध्य प्रदेशच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्यांचे स्वागत करणार असल्याचे सांगितले जाते. प्रचंड 2 जून रोजी दुपारी इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर ते उज्जैनला जातील जेथे श्री महाकाल मंदिराचे दर्शन घेतील. प्रचंड इंदूरमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेतील. प्रचंड 3 जून रोजी इंदूरमधील TCS आणि Infosys विशेष आर्थिक क्षेत्राला भेट देतील आणि त्याच दिवशी दुपारी ते नवी दिल्लीला रवाना होतील.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *