रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर
उद्धव ठाकरे गटाचे कोकण विभागाचे नेते संदेश पारकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर संदेश पारकर आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीमुळे चर्चेला वेग आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. तसेच काही ठिकाणी अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक लेन सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत.

संदेश पारकर यांनी यावेळी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संदेश पारकर भाजपमध्ये प्रवेश करणार का? आधी ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पारकर हे सातत्याने पक्ष बदलत असल्याने ते आता भाजपमध्ये जाणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.