उद्धव ठाकरे घेणार नितीश कुमारांची भेट
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जून रोजी पाटणा येथे बोलावलेल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी नितीश कुमार देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. बिहारचे मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सोमवारी सांगितले की, “भाजप विरोधी पक्ष या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.” या महिन्याच्या सुरुवातीला नितीश कुमार यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकता मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

दरम्यान, संजय राऊत यांचे वक्तव्यही समोर आले आहे. संजय राऊत म्हणाले, “12 जून रोजी नितीश कुमार यांनी भाजपसोबत नसलेल्या सर्व बड्या नेत्यांना आणि 2024 मध्ये बदल हवा असलेल्या सर्व देशभक्त पक्षांना आमंत्रित केले आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि पवार साहेबही आहेत.