
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज एसएससीचा निकाल जाहीर करेल. सकाळी 11 वाजता निकाल जाहीर होईल. निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि hscmahresult.org.in वर प्रसिद्ध केला जाईल. निकाल पाहण्याची लिंक महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाइटवर दुपारी 1 वाजता सक्रिय होईल. २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा झाली होती.
यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात ५०३३ केंद्रे सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी परीक्षेसाठी एकूण 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अधिकृत वेबसाइटवर परीक्षा बैठक क्रमांक, जन्मतारीख इत्यादी तपशील भरून विद्यार्थी त्यांचे गुणपत्रक तपासू शकतात. बोर्डाने यापूर्वी 25 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला होता. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेला सुमारे 14 लाख 56 हजार मुले-मुली बसले होते.

एसएससी निकाल कसा तपासायचा :
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
एसएससी निकाल 2023 च्या लिंकवर क्लिक करा.
परीक्षा बैठक क्रमांक इत्यादी आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
गुणपत्रक तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
गेल्या वर्षी एसएससीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. महाराष्ट्र एसएससी परीक्षेसाठी 8,89,506 मुले आणि 7,49,458 मुली अशा एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.