Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

लोकसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींचा मोठा दावा

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. गुरुवारी रात्री त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींबद्दल मोठं भाष्य केलं आहे. तेथील ‘नॅशनल प्रेस क्लब ऑफ वॉशिंग्ट’ येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकतील असे मला वाटत नाही.”

पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीतील विजयावर चर्चा करताना सांगितले की, “या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे बेरोजगारी आणि वाढत्या किमती. भारतीय अर्थव्यवस्था खूप चांगली आहे असे आपण म्हणू शकत नाही. विरोधी पक्ष पूर्णपणे एकत्र येत असून आम्ही भाजपचा पराभव करू,” असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी धक्कादायक निकाल लागणार असल्याचेही ते म्हणाले.

भारतात खूप मजबूत यंत्रणा आहेत ज्या पूर्वीपासून अस्तित्वात आहेत, त्याची प्रणाली आता कमकुवत झाली आहे. लोकशाही व्यवस्थेला चालना मिळाली तर हे प्रश्न आपोआप सुटतील. भारतात प्रेसचे स्वातंत्र्य कमकुवत होत चालले आहे, त्यामुळे त्यांच्याकडे संघटनेचा एक स्वतंत्र गट असावा जो कोणाच्याची दबाव आणि नियंत्रणाखाली नसेल, असे पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी सांगितले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *