सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • फणस शेती

फणस शेती

by सह्याद्री मराठी वृत्त 8 June 2023 0 Comments
08Jun, 2023

‘फणस’ हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष मागणी असल्याचे दिसते.

उष्ण दमट हवामान आणि मध्यम स्वरुपातील पाऊस असणाऱ्या भागात फणसाची वाढ चांगली होते. फणसाची लागवड करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नसते. पण खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास उत्पादनात वाढ होते. शक्यतो काळ्या चिकण मातीसदृश्य जमिनीमध्ये फणसाची लागवड करू नये.

फणसामध्ये ‘कापा’ आणि ‘बरका’ या दोन मुख्य जाती आढळतात. कापा फणसाचे गरे आपण कापून खाऊ शकतो. ते कापता येणे शक्य असतात, तर बरका फणस हा जास्त रसाळ असल्याने त्याचे गरे कापून खाता येत नाहीत. कापा फणसाचे गरे टिकण्याची क्षमताही अधिक असते. बरका फणस जास्त काळ टिकू शकत नाही. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळतो. या फणसापासून ‘सांदण’ हा पारंपरिक गोड पदार्थ केला जातो. फणसाच्या बिया म्हणजेच ‘आठळ्या’ या शिजवून किंवा त्यांची भाजी करून आपण खाऊ शकतो.

फणसाच्या कापा आणि बरका या दोन मुख्य जातींसह ‘विलायती फणसा’ची जातही आढळते. विलायती फणसाच्या कच्च्या फळांचा उपयोग भाजी करण्यासाठी करतात. ‘सकल्या’, ‘नीर’ आणि ‘डगूळ’ याही फणसाच्या काही अन्य जाती आहेत. लहान फळे येणारी आणि कमी काट्याची अशी ‘रुद्राक्षी’ फणसाची जात आपल्याला तामिळनाडूमध्ये आढळते.

कलमांच्या स्वरुपात फणसाची जमिनीत लागवड केली जाते. फणसाच्या दोन झाडांमधील अंतर हे 8 ते 10 मीटर असावे लागते. पावसाळी हंगामात जर लागवड केली, तर ती जास्त फायदेशीर ठरते. कापा आणि बरका अशा दोन्ही स्वरुपातल्या फणसांची मिश्र लागवड शेतात करू शकतात. पूर्ण वाढ झालेल्या फणसाच्या झाडाला दरवर्षी जून महिन्यात ३० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात फणसाच्या झाडाला फुले येतात. फुले आल्यानंतर साधारपणपणे ४ महिन्यांनी फळ धारणेला सुरुवात होते.

फणसाच्या झाडावर विशेष कोणत्याच किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. काही ठिकाणी खोड आणि फळ कूज किंवा खोडकिडा, पिढ्या ढेकणाचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. पूर्ण वाढलेल्या १५ वर्षांच्या झाडाला जास्तीत जास्त २५० फळ लगडू शकतात.

Next
अमृतसरमधील सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन पाडले
June 8, 2023
Previous
मार्गदर्शन केंद्र
June 8, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to फणस शेती?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !