सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • घरोघरी सौंदर्य सेवा

घरोघरी सौंदर्य सेवा

by सह्याद्री मराठी वृत्त 10 June 2023 0 Comments
10Jun, 2023

ब्युटी पार्लर हा अतिशय सोपा, कमी गुंतवणुकीचा आणि जास्त फायदेशीर सेवा व्यवसाय आहे. आजच्या युगात घरोघरी सौंदर्यसेवेची मागणी झपाट्याने वाढत आहे. आज बहुतांश महिलांना नोकरीसाठी घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना नेहमीच ‘टिपटॉप’ असणे आवश्यक आहे. वेळेअभावी महिलांना त्यांच्या व्यस्त जीवनात दिवसाच्या २४ तासांतून स्वत:साठी थोडा वेळ काढता येत नाही. अशा महिलांना घरी बसून सौंदर्यसेवा दिल्यास त्या आनंदाने तुमची सेवा घेतील. सौंदर्यसेवेची मागणी पाहता घरोघरी सौंदर्य सेवा देवून चांगले पैसे मिळू शकतात. ब्युटी पार्लरचा कोर्स केलेल्या महिलांसाठी हा व्यवसाय अधिक चांगला आहे.

घरोघरी सौंदर्य सेवा म्हणजे काय, ते प्रथम जाणून घेऊया. घरोघरी सौंदर्य सेवा म्हणजे महिला ब्युटी पार्लरमध्ये येत नाहीत तर ‘ब्युटीशियन’ला त्यांच्या घरी बोलावतात. ब्युटीशियन ब्युटी पार्लरशी संबंधित संपूर्ण किट म्हणजेच सौंदर्य उपचार घेवून ग्राहकांच्या घरी पोहोचतात. ज्या महिलांनी ब्युटी पार्लरचा कोर्स केला आहे, ज्या बजेटअभावी ब्युटी पार्लर सुरू करू शकत नाहीत किंवा घरात जागेअभावी ब्युटी पार्लर उघडू शकत नाहीत, अशा परिस्थितीत घरोघरी सौंदर्य देऊन त्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

ज्या महिलांनी ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला नाही, आणि त्यांना घरोघरी सौंदर्य सेवा व्यवसायाचा अवलंब करायचा आहे, अशा महिलांसमोर दोन पर्याय आहेत. पहिली म्हणजे ती ब्युटी पार्लरमधून कमी कालावधीचा कोर्स करून हा व्यवसाय सुरू करू शकते; किंवा पगार किंवा कमिशनवर दोन-चार सौंदर्यतज्ज्ञ महिलांना सोबत ठेवून हा व्यवसाय सुरू करू शकते. सौंदर्य सेवेसाठी कॉल आल्यावर, तिला तिच्या ठिकाणाहून सौंदर्य उपचारांसाठी पाठवून ती चांगली कमाई करू शकते.

या सेवेमध्ये तुम्ही मॅनिक्युअर, पेडीक्युअर, मेकअप, हेअर कटिंग, फेशियल, आय ब्रो, ब्युटी ट्रीटमेंट, हेअर कलर, नेल आर्ट, ब्राइडल मेकअप आणि हेना डिझाइन यासारख्या सेवा देऊ शकता. अगदी कमी गुंतवणुकीत घरोघरी सौंदर्य सेवा व्यवसाय सुरू करता येतो. या व्यवसायात ब्युटी पार्लरसारख्या महागड्या फर्निचरची आणि सजावटीची गरज नाही. यासाठी मेकअप आणि ब्युटी ट्रीटमेंटशी संबंधित उत्पादने आणि उपकरणे असणे आवश्यक असते, जे तुम्ही बॅगेत भरून कुठेही सहज नेऊ शकता.

घरोघरी सौंदर्य सेवा व्यवसायासाठी प्रसिद्धी आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही प्रसिद्धी करणार नाही, लोकांना सांगणार नाही, तोपर्यंत आपण व्यवसाय सुरु केला आहे, हे कुणासही कळणार नाही. घरोघरी सौंदर्य सेवा व्यवसायाच्या सुरुवातीला प्रसिद्धीची खूप गरज आहे. प्रसिद्धीशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. जसजशा स्त्रिया ओळखू लागतील, तशा त्या नियमित ग्राहक बनतील. घरोघरी सौंदर्य सेवा व्यवसाय वाढू लागेल. प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमांचा आधार घेता येईल. सौंदर्य सेवेसोबतच तुम्ही सौंदर्य उत्पादने विकून तुमचे उत्पन्न देखील वाढवू शकता. जमेल तेवढी मौखिक जाहिरात करा. कारण मौखिक जाहिरात ही कागदी जाहिरातीपेक्षा वेगाने पसरते. यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.

प्रसिद्धीसाठी तुम्ही वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊ शकता. शहरात ये-जा करता येईल, तेवढ्या भागात फलक लावता येतील. पत्रिका छापून वितरितही करता येतात. तुमच्या सेवेची माहिती तुमच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना व्हाट्सएपच्या माध्यमातून देत रहा. ऋतूनुसार सौंदर्य दिनदर्शिका तयार करा. ज्यामध्ये कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या ‘ब्युटी ट्रीटमेंट’ ची आवश्यकता आहे याची माहिती द्या. सणासुदीच्या काळात दिल्या जाणाऱ्या विशेष सेवेचा उल्लेख करा. ग्राहकाला दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटे आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. सौंदर्य उपचारात लागणारे सर्व साहित्य सोबत ठेवा. एकाच ठिकाणी सेवा देत असताना दुसरीकडे जाण्याची घाई करू नका. सौंदर्य उपचारांसाठी पूर्ण वेळ द्या. जेणेकरून ग्राहक तुमच्या कामावर पूर्णपणे समाधानी असेल. नियमित ग्राहकांसाठी काही योजना तयार करा. सौंदर्य सेवेसाठी तुम्ही कोणतेही उत्पादन वापरता, ते ब्रँडेड असले पाहिजे. कमी किंमतीची सौंदर्य उत्पादन वापरू नका. कधीकधी अशी उत्पादने चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. यामुळे तुमचा व्यवसाय बंद होवू शकतो.

Next
मणिपूरमध्ये शांतता समितीची स्थापना
June 12, 2023
Previous
मिरची पावडर उद्योग
June 10, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to घरोघरी सौंदर्य सेवा?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !