मिरची पावडर उद्योग

लाल मिरची पावडरचा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. लाल तिखटला मसाल्यांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. लाल तिखट सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. भारतीय जेवणात लाल तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशात हा व्यवसाय करोडो रुपयांचा आहे. या व्यवसायातील नफा पाहता लाल मिरची पावडरचा व्यवसाय अनेक लहान-मोठ्या कंपन्या करीत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात अनेक लोक या मसाल्याच्या उद्योगात गुंतलेले आहेत. असे असूनही या व्यवसायातील स्पर्धा नाममात्र आहे. तुमच्या उत्पादनाचा दर्जा आणि दर योग्य असेल तर ते बाजारात यायला वेळ लागणार नाही.

मसाले व्यवसायास ब्रँड नाव हवे. मसाल्यांच्या व्यवसायाच्या संधी, आवश्यक परवाने, ग्राइंडिंग मशीन गरजेचे असते. मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडरची मागणी सर्वाधिक आहे. लाल तिखटाचा वापर सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भारतीय जेवणात लाल तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्च्या मालाच्या स्वरूपात लाल मिरची स्वतः खरेदी करा. मिरची बारीक करुन पूड वेष्टनबंद करावी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लाल तिखट विकत घेऊनही हा व्यवसाय करू शकता. यासाठी एखाद्या चांगल्या कंपनीकडून थेट पूड खरेदी करा. तुमचे ब्रँड नाव देऊन त्यांची विक्री करा. अशा प्रकारे व्यवसाय केल्याने कच्चा माल खरेदी करण्याचा, यंत्रसामग्रीवर होणारा खर्च आदींचा त्रास वाचतो.
लाल मिरची पावडरला वर्षभर मागणी असते. ती वर्षातील 365 दिवस विकली जाते. खेड्यांपासून लहान-मोठ्या शहरांपर्यंत त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची वाढती मागणी पाहता हा व्यवसाय सुरू करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. लाल मिरची पावडर बनविण्याच्या व्यवसायातून होणारा नफा पाहता अनेक लहान-मोठ्या कंपन्या लाल तिखटाचा व्यवसाय करीत आहेत. अख्खी लाल मिरची आणून स्वतः दळून घ्यायची असेल तर कच्च्या मालामध्ये अख्खी लाल मिरची लागेल. कच्चा माल जितका चांगला तितका तुमच्या उत्पादनाचा दर्जा चांगला असतो. याशिवाय तिखट तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीनची आवश्यकता असेल. मिरची पावडर उद्योग सुरू करण्यासाठी चांगल्या प्रतीची लाल मिरची असली पाहिजे. कच्च्या मालाची गुणवत्ता जितकी चांगली तितकी पावडर बनते. बाजारात त्याची विक्रीही अधिक आहे.

बाजारात अनेक आकारांची लहान-मोठी मसाला ग्राइंडर मशीन उपलब्ध आहेत. तुम्हाला घरबसल्या छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक छोटे यंत्र खरेदी करा. मसाला ग्राइंडर मशीन व्यतिरिक्त तुम्हाला वेष्टनबंद करण्यासाठी तसे यंत्र खरेदी करावे लागेल. यासोबतच मसाल्यांचे वजन करण्यासाठी वजन यंत्र असणेही गरजेचे आहे. या सर्व छोट्या यंत्रांच्या मदतीने गृहोद्योग म्हणून लाल तिखटचा व्यवसाय सुरू करता येईल. मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित मशीन देखील घेऊ शकता. ज्यामध्ये ग्राइंडिंग, वजनमाप आणि पॅकिंग हे सर्व एकाच प्रक्रियेत आपोआप होते. मिरची पावडर बनविण्याच्या यंत्राची निवड युनिटच्या प्रमाणानुसार केली जाते. बाजारातून घाऊक दराने सुकी लाल मिरची खरेदी करा. छोट्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर शहरातील घाऊक बाजारातून लाल मिरची खरेदी करा. जवळच्या गावात उत्पादन केले तर तेथूनही विकत घेता येते.
जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल, तर हंगामातच वस्तू खरेदी करा; जेणेकरून वर्षभर विक्री करता येईल. लाल मिरचीचे उत्पादन अधिक असलेल्या शहरातील घाऊक बाजारातून खरेदी करण्याऐवजी तेथे जाऊन थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा. प्रथम लाल मिरच्या स्वच्छ करुन घ्या. जेणेकरून दळताना त्यात कचरा राहणार नाही. मिरचीची साफसफाई स्वहस्तेसुध्दा केली जाते. आजकाल मिरचीचे देठ साफ करण्याचे यंत्रही बाजारात आले आहे. यंत्राच्या सहाय्याने दोन ते चार क्विंटल मिरची एकाच वेळी कमी वेळात साफ करता येते. साफसफाई केल्यानंतर मिरच्या उन्हात चांगल्या वाळवाव्यात. बारीक केल्यानंतर पावडर वेष्टनबंद करावी. या व्यवसायासाठी फर्म नोंदणी, एमएसएमई नोंदणी, ट्रेडमार्क नोंदणी, जीएसटी नोंदणी, व्यापार परवाना लागेल.
कोणत्याही व्यवसायासाठी परवाना, विपणन खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही उत्पादनाचे विपणन करीत नाही, तोपर्यंत तुम्हाला व्यवसाय वाढवता येणार नाही. लाल मिरची पावडर व्यवसायाच्या विपणनासाठी सर्वप्रथम तुमचे शेजारी, नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींमध्ये तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी करावी. तुमच्या शहरातील किराणा दुकाने आणि मसाल्यांच्या दुकानांना त्याचा पुरवठा करावा. लाल तिखट विक्रीसाठी सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागेल. सुरुवातीला व्यवसाय छोटा आणि नवीन असल्याने कमाईही कमी होते. जसजसा व्यवसाय वाढतो तसतसा कमाईचा आकडाही वाढत जातो.