अमरावतीमधील पाणी प्रकल्पाची पाहणी
अमरावतीमधील बोराळा येथे गोड्या पाण्याचा प्रायोगिक प्रकल्प साकारला जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रायोगिक प्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी पत्रकारांना गडकरी यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर खाऱ्या पाण्याच्या पट्ट्यात येत असलेल्या अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील एकूण ८९४ गावांना जमिनीपासून केवळ ५० फूटांच्या खोलीवर गोडे पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या पूर्ण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन नाही, स्थलांतर नाही तसेच पुनर्वसनही नाही. त्यामुळे खर्च कमी असेल. प्रकल्पामुळे खारपाण पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. शेतीसाठीही मुबलक प्रमाणात गोड पाणी उपलब्ध होईल.”

यावेळी ‘पूर्णा’ नदीच्या खारपाण पट्ट्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाबाबतही गडकरी यांनी पत्रकारांना माहिती दिली.