ओला एस वन एअरला मोठी पसंती

‘ओला’ इलेक्ट्रिकने भारतीय बाजारपेठेवर तुफान कब्जा मिळविलेला दिसत आहे. या कंपनीने विद्युत दुचाकी खरेदीदारांच्या हृदयात स्थान मिळविले आहे, असेच म्हणावे लागेल. कंपनीच्या ‘ओला एस वन प्रो’ या दुचाकीने ‘टीव्हीएस’, ‘आयक्युब’, ‘ॲदर ४५० एक्स’, ‘बजाज चेतक’ इलेक्ट्रिक तसेच ‘ओकीनावा’ यांसारख्या लोकप्रिय दुचाकींना मागे टाकले आहे. ज्यांनी ‘ओला एस वन एअर’ साठी आगावू नोंदणी केली होती, त्यांच्यासाठी ती रुपये 1.09 लाखांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. पण जे लोक नंतर खरेदी करतील, त्यांच्यासाठी ती 10,000 रुपयांनी महाग होणार आहे.

‘ओला एस वन एअर’ विद्युत दुचाकी ‘ओला एस वन प्रो’ मॉडेलच्याच धर्तीवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये 3 केडब्लूएचचा छोटा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. ज्याला एका चार्जवर 125 किमीची रेंज मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘एस वन एअर’ मध्ये 4.5 केडब्लूची हब मोटर देण्यात आली आहे. ही स्कूटर केवळ 3.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तास वेग पकडू शकते. त्याचा अंतिम वेग 90 किमी प्रति तास आहे.

कंपनीने ‘एस वन एअर’ स्कूटरसाठीची रुपये 1.1 लाखाची ऑफर वाढविण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची माहिती देताना ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भावीश अग्रवाल यांनी ट्विट केले की, ‘एस वन एअर’ची मागणी कंपनीच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मोठ्या संख्येने ग्राहकांनी कंपनीला सर्व आरक्षणांसाठी 1.1 लाख रुपयांची ऑफर पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही ही ऑफर सर्व ग्राहकांसाठी 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाढवीत आहोत. जलद वितरणासाठी लवकर खरेदी करा!”

दरम्यान, जर आपण ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन’ च्या जुलै 2023 च्या विद्युत दुचाकीच्या विक्री अहवालावर नजर टाकली तर, पहिला क्रमांक ‘ओला एस वन प्रो’ ला होता. 19,263 ग्राहकांनी ती विकत घेतली. ‘ओला एस वन प्रो’ भारतात सर्वाधिक विकली जाणारी विद्युत दुचाकी आहे. यात 4 किलोवॅटचा बॅटरी पॅक आहे, जो एकदा पूर्ण चार्ज केल्यावर कंपनीच्या दाव्यानुसार 181 किमी पर्यंतचा पल्ला गाठू शकतो. ‘ओला एस वन प्रो’ चा उच्च वेग 116 किमी/प्रति तास इतका आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *