उज्ज्वला योजनेतील सिलींडरसाठी अनुदान मंजूर

सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेंतर्गत घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान मंजूर केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने सिलिंडर २०० रुपयांनी कमी केल्यास दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होईल. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलतात. याआधी एक ऑगस्टला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी केल्या होत्या; मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलींडरची किंमत ११०३ रुपये होती. मुंबईत एलपीजी सिलींडरची किंमत ११०२.५० रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये आणि चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होती.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *